बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची कार्ये :-

    1. राज्यातील सोनार समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
    2. सोनार समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे व त्याची वसूली करणे.
    3. सोनार समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
    4. सोनार समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
    5. राज्यातील सोनार समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनासाठी अहवाल तयार करणे.
    6. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजूरी दिलेल्या योजना राबविणे.